Categories: Uncategorized

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले अशा महिलांना पिंपरी चिंचवड मनपा कडून स्वयंरोजगार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ मे) : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले अशा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने उमेद जागर उपक्रम राबविण्यात येतो.

याअंतर्गत सिम्बॉयसिस ओपन स्किल युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत बेसिक व ॲडव्हान्स शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले.  व अश्या महीलांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहे . तसेच  थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू करण्यात आले असून  या ठिकाणी कोविड योध्दा महिला बचत गटातील महिला काम करीत आहेत. सद्यस्थितीत जुन्या कपड्यांपासून पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनवण्याचे काम चालू आहे.

तथापि या महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने सदर बचत गटासोबत सोबत ३ वर्षे करारावर सहा महिन्यांसाठी ५० हजार दरमहा याप्रमाणे खेळते भांडवल देण्यात येणार आहे.  तसेच  बचत गटाला शिलाई कामकाजाच्या ऑर्डर देण्यासाठी महापालिका  मदत करणार आहे. त्यापुढील भांडवल व खर्च महिलांनी करावयाचा आहे.

महापालिकेकडून आयुक्त तथा प्रशासक  शेखर सिंह यांच्या हस्ते कोविड योध्दा बचत गट क्रमांक १ च्या अध्यक्षा सुवर्णा भालेराव,रंजना शेंडे,लता बवले, मीना चौधरी, कविता साबळे,,स्मिता अंकुशे, मंगल लोंढे यांना आज आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी  समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समाजसेवक संतोषी चोरगे, समूह संघटक रेश्मा पाटील, वैशाली खरात, मनोज मरगडे आदी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago