महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक १९ जानेवारी २०२३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगणक व्यवस्थापन विभागाच्या अभ्यासमंडळावर यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक प्रा.डॉ.शिवाजी मुंढे यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचा कालावधी पाच वर्षांचा असून प्रा.डॉ.मुंढे यांना अध्यापनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे.
याआधी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनियतकालिकांमध्ये त्यांचे १२५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून ते संशोधन मार्गदर्शक म्हणूनदेखील कार्यरत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.पदवी प्राप्त केली असून सध्या आठ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी करीत आहेत.
परदेशांमधील परिषदांमध्येदेखील त्यांनी सहभाग घेतला असून अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन देखील त्यांनी केले आहे.त्यांनी सहा पुस्तकांचे लेखन देखील केले असून विविध शोधनियतकालिकांच्या संपादक मंडळावर देखील सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…