Categories: Uncategorized

नवी सांगवीकरांचं ठरलंय; आमचं मत चिंचवडच्या विकासालाच.. म्हणजेच शंकर जगतापांनाच !’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.7 नोव्हेंबर 2024 –  नवी सांगवीमध्ये आज (गुरुवारी) झालेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी परिवारजनांशी संवाद साधला, आणि त्यांचे विजयासाठी आशीर्वाद घेतले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील बंधू – भगिनी आणि सर्व सामान्य जनता ही कायम माझ्या हृदयात आहे. आणि त्यांचे स्थान कायम तसेच राहील. त्यांच्या या विश्वासामुळेच लढण्याची ताकत मला मिळाली आहे. त्यांनी प्रेमाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात माय – बाप जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.

सकाळच्या सत्रात नवी सांगवी येथे निघालेल्या प्रचार रॅलीत  एम के चौक, समता नगर, गणेश नगर, कीर्ती नगर, समर्थ नगर, आदर्श नगर मधील चैत्रबन सोसायटी, सरस्वती पार्क या ठिकाणी नागरिकांशी भेटी गाठी घेत मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साधला. माता- भगिनींकडून त्यांना औक्षण केले जात होते.

या प्रचार रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, बळीराम जाधव, सौ. शीतल आगरखेड, कविता निखाडे, सूर्यकांत गोफणे, बाबुराव शितोळे, प्रशांत कडलक, बाळासाहेब पिल्लेवार, सुरेश तावरे, डॉ.देविदास शेलार, सखाराम रेडेकर, राजू नागणे, राजू पाटील, आप्पा पाटील, शामराव पताडे, संदीप दरेकर, राजू मोरे, रोहन भिसे, सुनील कोकाटे, गणेश बनकर, उमेश झरेकर, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, शिवशरण टेंगळे, बसवराज हिरेमठ, जयसिंग जाधव, अभय नरवडेकर, अमित घोडसाळ, चंद्रकांत बेंडे, संजय मराठे, साई कोंढरे, लालासाहेब ढोरे, शिरीष कवडे, संतोष पाटील, ज्ञानेश्वर खैरे, सचिन खराडे, संभाजी ढवळे, विशाल खैरे, संभाजी भेगडे, गिरीश देवकाते,भरत पेठे, विक्रम भेगडे, मनीष भापकर, राजेश साळुंखे, पवन साळुंखे, प्रवीण जाधव, सुभाष पावर, अशोक कवडे, अविनाश खुंटे, प्रवीण पाटील, योगेश कदम, ललित म्हसेकर, राजू शिंत्रे, शैलेश जाधव, मनीष रेडेकर, विकी रेडेकर, विशाल गायकवाड, संतोष पाटील, रामदास पोखरकर, भाऊसाहेब जाधव, रवींद्र रासने, रविकुमार चौधरी, प्रवीण देवासी, श्रीकांत पवार, गोविंद मुखणे, अमित कानडे, बोरसे सर, योगेश कदम यांच्यासह नवी सांगवीतील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग, युवा वर्ग भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उमेदवार ‘शंकर जगताप’ म्हणाले की, माझ्या याच परिवारामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. स्व. लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रेरणेने चिंचवड विधानसभेतून जास्तीत जास्त मतांनी विजय मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि विकासपुरुष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साथ देवून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आपल्याला आणायचे आहे, असे उमेदवार जगताप म्हणाले.

————————————–

गेल्या 10 वर्षांत स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला होता. शहरातील पाण्याचा प्रश्न. जीवघेण्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा. शहरातील गावांना ‘स्मार्ट सिटी’ बनवलं. आमदार फंडातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागात विकासात्मक कामे केली. तसेच अडीअडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. विविध आरोग्य शिबिरे घेतली. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडास्पर्धा आयोजित केल्या. ज्येष्ठ नागरिक कामे केली. आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केले. विविध धार्मिक सण, उत्सव आयोजित करून सामाजिक एकोपा जपला. त्यांनी जनहितासाठी अनेक विकास कामे केली.  तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटवला. या आणि अशा अनेक कामांमुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्व. लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकप्रिय ठरले होते.

 जगताप शंकर पांडुरंग (चिंचवड विधानसभा महायुतीचे उमेदवार)

Maharashtra14 News

Recent Posts

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

4 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

6 days ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

6 days ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

6 days ago

चिंचवड मतदारसंघातील धनगर समाजाची ताकद शंकर जगताप यांच्या पाठीशी … शंकर जगताप यांना धनगर क्रांती सेना महासंघाचा जाहीर पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…

1 week ago