Categories: Uncategorized

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी एकवटले सदनिकाधारक … रूणवाल क्लासिक सोसायटीच्या बैठकीत एकमताने जगताप यांना पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.७ नोव्हेंबर २०२४ – यंदाची विधानसभा निवडणूक ही फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा परिपूर्ण विकास या एकाच ध्येयाने मी लढत आहे. मागील दहा वर्षात स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सोसायट्यांमधील समस्या सोडविण्यात आम्हाला बऱ्याच अंशी यश आले आहे. तरीही आगामी काळात सोसायट्यांच्या उर्वरित समस्याबाबत विधानसभेत आवाज उठवत त्या समस्या मार्गी लावून  सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अभिमान वाटेल असा विकास करून दाखविणार, असे आश्वासन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिले.

भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील रूणवाल क्लासिक सोसायटीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे, तानाजी बारणे, दिनेश यादव, कुंदन सिंग, अशोक बानखेले, बळवंत फावडे, अरुण गायकवाड, राजेंद्र शेळके, संतोष टेकाळे, डी.एम. कोळी, तुषार नाणेकर, मधुकर आंब्रे यांच्यासह सोसायटीतील पदाधिकारी,  सदस्य व रहिवासी तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले की, कोणतीही निवडणूक ही आरोप-प्रत्यारोप, जाती-धर्मावर किंवा मतदारांची दिशाभूल करून न होता फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे. लोकसभेच्या वेळी विरोधकांनी फेक नरेटिव्हचा वापर करून जनतेची फसवणूक केली. मात्र यावेळी जनता या भूलथापांना आणि अपप्रचाराला बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे.

मागील अनेक वर्षांपासून चिंचवड विधानसभाच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातील अनेक समस्या या मूलभूत आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र आगामी काळात शासन दरबारी आवाज उठवून सोसायटीतील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा शब्द जगताप यांनी सोसायटीधारकांना यावेळी दिला.

दरम्यान, रूणवाल क्लासिक सोसायटीतील सर्व सदनिकाधारकांनी या निवडणुकीत भाजपला मतदान करून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवायचे असा निर्धार यावेळी एकमताने केला.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago