‘ कबुतरांच्या उच्छादाने सांगवीकर हैराण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केव्हा जाग येणार ? … नागरिकांचा संतप्त सवाल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक
लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्या उपयात कबुतरांना धान्य खायला टाकायला दिल्याने तुम्हाला पुण्य मिळते असे सांगितले जाते. पण सांगणाऱ्या ला हे घातक परिणाम ठरू शकते याची कल्पना नसावी.

काहीही असो मानवी वस्ती आणि परिसरात हवेमुळे पसरणारी कबुतरांची पिसे अन् विष्ठा, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे कायमच बोलले जाते. पण, तरीही भयावह वेगाने वाढणाऱ्या या पारव्यांना भूतदया या नावाखाली दाणे टाकण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत.

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी भागातील शनी मारुती मंदिरा समोर असणाऱ्या मिलिटरीच्या मैदानात अनेक नागरिक या कबुतरांना धान्य टाकताना दिसतात, त्यामुळे पक्षी ही त्याठिकाणी येतात आणि आतातर त्यांचे प्रमाण खूप मोठया प्रमाणावर वाढले आहे. महानगरपालिका आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभाग यांना वारंवार पत्र देऊन ही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत, तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते. या परिसरातील जेष्ठ नागरिक या ठिकाणी फिरायला तर लहान मुले खेळायला येतात, शेजारी नागरीवस्ती आहे, त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

ठाणे आणि पुणे महापालिकेने अशा अतिउत्साही पक्षिप्रेमींना पाचशे रुपयांचा दंड ठोठावणे सुरू केले आहे, आणि आता तर एका नागरिकावर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे, आता पिंपरी चिंचवड महापालिकेलाही केव्हा जाग येणार ? असा प्रश्न परिसरातील नागरिक करत आहेत. या पक्षांच्या वाढीमुळे स्वस्तात पुण्य मिळण्याच्या नादात प्राणीमित्र किंवा असे उपाय करणारे मात्र अनेकांचे आयुष्य धोक्यात घालत असताना दिसत आहे. पुण्यात आता अशा कबुतरांना धान्य टाकताना आढळल्यास किमान पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पक्ष्यांवर प्रेम करावे, त्यांच्या हिताची काळजी घ्यावी; पण यामध्येही काही तारतम्य असावे.

“कबुतराच्या विष्ठेतून जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो. निसर्गात प्रत्येत प्राण्याच्या आतड्यामध्ये जीवाणू असतात. ते दुसऱ्या प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. त्यांच्या विष्ठेमध्ये असलेल्या विषाणूमुळे ऍलर्जी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. कबुतरामुळे उद्भवलेला प्रश्न त्रासदायक आहे. इमारतीच्या कोपऱ्यामध्ये ही कबुतरे ढाबळी बनवतात तिथे त्यांचे चक्र सुरु असते. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी. काही जण प्राणी मित्र असतात. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे पक्ष्यांना दाणे टाकत असतात. एकाच जागी अन्न मिळाल्याने त्यांची प्रजनन क्षमता वाढते.

कबुतर अनेक प्रकारचे आजार फैलावू शकतात. त्यामध्ये ‘हिस्टोप्लास्मोसिस’सारख्या आजाराचा समावेश आहे. कबुतरांच्या विष्ठेत ‘एस्परगिलस फंगस’ नावाचा बुरशीचा एक प्रकार आढळतो. तो मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतो. कबुतरांची विष्ठा आम्लयुक्तही असते व त्यामुळे छत खराब होऊन लिकेजही होऊ शकते! लहान मुले, अस्थमाचे रुग्ण तसेच कमजोर रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या लोकांना कबुतरांच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लास्मोसिस इन्फेक्शन होऊ शकते.

या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, कोरडा खोकला आणि सुस्तीसारखे फ्लुची लक्षणे दिसतात.’ क्रिप्टोकॉकासिस फंगल इन्फेक्शन’चेही कबुतरे कारण बनू शकतात. त्यामध्ये फुफ्फुसे व चेतासंस्था कमजोर होते. हे सर्व विचारात घेता कबुतरांवर आपण जरूर प्रेम करावे; पण दुरूनच, इतका आपण धडा घ्यायचा!

Maharashtra14 News

Recent Posts

आकुर्डी येथे माणुसकी पूर्णपणे संपली असल्याचे चित्र … नेपाळ धुमसत असताना एका नेपाळी तरुणाकडून मुक्या प्राण्याची तलवारीने निर्दयीपणे हत्या.!!!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…

5 days ago

सभासदांना १५% लाभांश देत, आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…

5 days ago

पायलट लायसन्स सेमिनार २१ सप्टेंबरला … पायलट होण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…

7 days ago

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…

1 week ago