Google Ad
Uncategorized

एअरपोर्टवर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची RT- PCR टेस्ट करण्याबरोबरच त्यांना काही दिवस विलगीकरणात ठेवा – सुरज गजानन बाबर

महाराष्ट्र 14 न्यूज, ₹दि.१८ मार्च) : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव शेजारील तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये पाहता तसेच तेथील वाढती रुग्णांची संख्या पाहता एअरपोर्टवर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची RT- PCR टेस्ट करण्याबरोबरच त्यांना काही दिवस विलगीकरणात ठेवणेबाबत चे निवेदन सुरज गजानन बाबर, अध्यक्ष:  कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना यांनी भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे की,  मी आपणास एक भारताचा नागरिक म्हणून विनंती करू इच्छितो की, गेल्या अडीच -तीन वर्षांमध्ये कोरोना साथीने संपूर्ण विश्वाला ग्रासले तसेच यामध्ये लाखो नागरिकांचे जीवही गमवावे लागले, तसेच हा साथीचा प्रादुर्भाव पसरण्याचे मुख्य कारण बाहेरील देशातून आपल्या देशामध्ये आलेले नागरिक व यामुळे याचा खूप मोठा परिणाम आपल्या देशातील नागरिकांवर झाला.

Google Ad

आज आपण जर पाहिले तर कोरोना संपूर्णपणे नष्ट झालेला नाही किंवा त्याच्यावर अजून पर्यंत कोणतीही प्रभावी औषध नाही हे नाकारून चालणार नाही , कोरोनाचा उगम सर्वप्रथम चीन या देशांमधून झाला व आज आपण परिस्थिती पाहिली तर चीनमध्ये व दक्षिण कोरिया या देशामध्ये डेल्टाक्रोंन व ओमायक्रोन व्हेरीयंट  रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याचे आढळत आहे. आंतरराष्ट्रीय अहवालांवर विश्वास ठेवला तर चीनमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे. गेल्या दोन आठवड्यात चीनमध्ये 10 हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहेत. तसेच चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या प्रांतांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे.

त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळं संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हॅरिएंट BA1 आणि BA2 यांच्यापासून हा नवा व्हॅरिएंट तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण, आता मात्र WHO नंही कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात धोका व्यक्त केला आहे यामुळे याचाही विचार आपण करावा. यामुळे बाहेर देशातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता तसेच आपल्या देशामध्ये परत मागील दोन-तीन  वर्षांसारखी परस्थिती उद्भवू नये याकरिता बाहेरच्या देशांमधून येणाऱ्या सर्व नागरिकांची rt-pcr टेस्ट करावी व काही दिवस त्यांचे विलगीकरण करणे अनिवार्य करावे जेणेकरून आपल्या देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतील.

उपरोक्त नमूद केलेल्या देशांमध्ये त्याचबरोबर आपले परदेशात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी त्यांना मायदेशी आणण्यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे माननीय मंत्री महोदय चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता त्याकरता पूर्वतयारी उदाहरणार्थ ऑक्सिजन ,पुरेसे बेड, आरोग्य विभागाची दक्षता यावर लक्ष देणे गरजेचे आहे, लसीकरण मोहीम पुनश्च एकदा वेगाने करावी , सर्वप्रथम वयवर्ष  60 वरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस, त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर व इतर नागरिक यांचे लसीकरण याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी,  यामध्ये गाफील राहून चालणार नाही. अशी मागणी सुरज गजानन बाबर,
अध्यक्ष:  कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना यांनी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!