Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहर समस्त नाभिक समाज व बारा बलुतेदार महासंघ यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध आंदोलन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४/३/२०२२) : आज (१४ मार्च) रोजी सकाळी ११ वा. जाहीर निषेध आंदोलन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर समस्त नाभिक समाज व बारा बलुतेदार महासंघ यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे करण्यात आले .

या प्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व रावसाहेब दानवे यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरा समोर प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी. दानवे विरोधात घोषणा देत निषेध नोदवण्य त आला तहसील कार्यालय जिल्हा अधिकारी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कडे लेखी तक्रार करण्यात आली आहे यावेळी शहराध्यक्ष गणेश भाऊ वाळुंजकर सतीश दादा दरेकर प्रदेश अध्यक्ष कुंभार समाज अध्यक्ष विशाल जाधव युवा प्रदेशाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ सोमनाथ शेळके जिल्हाध्यक्ष अनिताताई मगर

Google Ad

जिल्हाध्यक्ष महिला महेश भागवत पिंपरी चिंचवड संतोष कुमावत बेलदार समाज विनोद शिंदे कृष्णराव गिर गुने धनगर समाज महेश गवस मराठा महासंघ अध्यक्ष ज्येष्ठ नेते पांडुरंग दोडके पुंडलिक सैंदाणे अशोक मगर आनंद कुदळे ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष कविता ताई वाळुंज खेड तालुका अध्यक्ष माजी अध्यक्ष संतोष शिंदे हेमंत श्रीखंडे पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक पंडीत उपाध्यक्ष शहर हरिभाऊ शेळके नागेश भोपुलकर

सर्व पिंपरी चिंचवड विभाग अध्यक्ष मारुती काटके (भोसरी) संदीप महाले चिंचवड (वाल्हेकर वडी )दत्ता खरे (निगडी ) किशोर पवार (वाकड) आशिष जाधव संघटक नितीन कुटे राजू माने भोसरी शंकर गायकवाड (मोशी )राजू लोखंडे महेंद्र बीडकर (पिंपरी )अंकुश जाधव ( सागवी पिंपळे गुरव) चेतन महालेअभय श्रीमगले (भूमकर वस्ती) नानासाहेब सूर्यवंशी हरी सुरवशी भारतचिते प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र चित्ते इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

“रावसाहेब दानवे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी केले जाणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

दानवे यांनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं? –

मागील आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरत खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते. यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीवर टीका करताना दानवे यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. “महाविकास आघाडीच्या सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था ही तिरुपतीमधील न्हावी (नाभिक) सारखी झाली आहे.” असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. यामुळं नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर दानवे यांच्या विरोधात निदर्शने करत आंदोलन केली जात आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!