‘अप्पा रेणूसे’ यांनी आयोजित केलेल्या आजचे कट्ट्याचे मानकरी होते, भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मा. धीरज घाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे हे राजकीय धुरंधर आणि त्यांच्याबरोबरीने सामाजिक कामांत अग्रेसर असणारे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष अविनाश चोरडिया, माजी आमदार विलासराव लांडे यांनी पिंपरी चिंचवडचे राजकारण, कै. लक्ष्मणराव जगताप यांच्याशी असणारे दृढ ऋणानुबंध या आठवणी उलगडतानाच राजकीय किस्से सांगून अक्षरश: धमाल उडवून दिली.
या निमित्ताने उपस्थित सर्व मानकरींचे औक्षण करून त्यांना शाल, शिंदेशाही पगडी, मोत्याची माळ, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, तसेच इतर सर्व उपस्थितांनी गांधी टोपी परिधान करून भारत मातेचा बॅच छातीवर लावून भारत मातेला वंदन केले.
या प्रसंगी अप्पा रेणूसे, विलासराव भणगे, पराग पोतदार, रवींद्र संचेती, अॅड. दिलीप जगताप, मधुकर कोंढरे, सचिन डिंबळे, शंकरराव कडू, नेमीचंद सोळंकी, विराज रेणुसे, आकाश वाडघरे, संदीप फडके, महावीर डाकलिया,मंगेश साळुंके, संदीप भोसले, सुनील सोनवणे, अक्षय लिमन, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर आदी अप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होता.
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…