Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ मे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणा-या व्यावसयीकांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार व अंमलदार तळेगाव चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना. पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरुन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचेकडील अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे याठिकाणी छापा घातला.

या छाप्यात ‘मे महाराष्ट्र मिल्क डेअरीचे’ मालक  साजीद मुस्तफा शेख वय ३२ वर्षे रा. शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव पुणे, जावेद मुस्तफा शेख वय ३८ वर्षे रा. सदर कामगार, राकेश श्रीबुध्दराम सिंग वय २६ वर्षे रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चितराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे, अल्ताफ हजरतदीन शेख वय २७ वर्षे रा. सदर अभिषेककुमार योगेशबाबु यादव वय २२ वर्षे रा. सदर , सर्फराज शराफतउल्ला शेख वय ३५ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेतले.

त्यांचेकडुन भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता चापरत असलेले १४,००० /- रुपये किंमतीचे १४० लिटर अॅसेटीक अॅसीड ६,३२०/-रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल. ४,५००/- रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट ३.३२,५००/-रुपये किंमतोची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२००/-रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४,६६,५२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करुन, पुढील कारवाईकामी ताब्यात घेतला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago