Categories: Uncategorized

मनपा टॅक्स भरण्यासाठी सांगवी कर संकलन कार्यालयासमोर रांगा … जेष्ठ नागरिकांनाउन्हाचा करावा लागतोय सामना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कर संकलन व कर आकारणी विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 810 कोटी रुपयांची कर वसूल केला आहे. महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 810 कोटींचा टप्पा पार केला असून, हा एक माईलस्टोन ठरला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महानगरपालिका हद्दीत 5 लाख 97 हजार 487 मालमत्ता आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षाचा कर (Property tax) भरण्यासाठी नागरिकांना कर पावत्या येत आहेत, मनपाने 31 जून पर्यंत टॅक्स मध्ये अनेक सवलती जाहीर केल्याने त्याचा लाभ घेण्याकरिता मालमत्ता धारकांनी कर संकलन केंद्रासमोर रांगा लावल्याचे दिसून येत आहे.

मालमत्ता कर वसुलीसाठी नागरीकांना मालमत्ता कराची बिल ऑनलाईन तसेच कर भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु सवलत असतानाही सांगवी कर संकलन कार्यालयात अनेक नागरिक रांगेत दिसत आहेत, यात जेष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. या वर्षी उन्हाचा पारा अधिक वाढल्याने, एखाद्या नागरिकास उन्हाने काही त्रास होऊन एखादी घटना घडण्यागोदर या ठिकाणी नागरिकांना बसण्याची व पाण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने करावी अशी मागणी कर भरण्यासाठी येणारे नागरिक करत आहेत. तसेच कर भरणा करण्यासाठी असणारी जागा अपुरी असल्याने कर्मचाऱ्यांना ही अडगळीत काम करावे लागत असल्याचे दिसत आहे, तरी मनपाने बाजूला अनेक दिवस बंदअवस्थेत असणारी खोली त्यांना उपलब्ध करून दिली तर त्यांना काम करणे सुलभ होईल अशी मागणी करण्यात आली आहे.

मनपाच्या वतीने कर सवलत आणि तो भरण्यासाठी लागणारी माहिती याचे पत्रक छापले आहे, परंतु मनपा कर्मचारी ते नागरिकांना वाटून प्रभोधन करताना दिसत नाहीत. तसेच कर भरणा ऑफिस च्या दर्शनी भागात या विषयी माहिती लावणे गरजेचे असून ऑनलाइन कर भरताना सर्व्हरच्या येणाऱ्या अडचणी वरिष्ठांना सांगून दूर कराव्यात अशी मागणीही अनेक नागरिकांनी केली.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

23 hours ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

3 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago