Categories: Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवाळी गिफ्ट, मोठी घोषणा करत 5 लाखांपर्यंत… दरवर्षी मिळणार लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी मंगळवारी मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी दिवाळीचे भेट देशातील 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठांना दिली. नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान योजनाचा नवीन टप्पा आयुष्मान भारत “निरामयम” योजना सुरु केली. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) मध्ये आयोजित कार्यक्रमात 12 हजार 850 कोटी रुपयांची ही योजना लागू केली.

आता 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणारे सर्व वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्वांचा आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत अंतर्गत पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहे. दरवर्षी पाच लाखांपर्यंतच्या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) योजनेत 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी आहे. त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तसेच जे परिवार या योजनेचा आधीपासून लाभ घेत आहे, त्या परिवारातील वृद्ध सदस्यांसाठी वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र उपचार उपलब्ध असतील. त्याचा फायदा देशातील सुमारे 4.5 कोटी कुटुंबांतील 6 कोटींहून अधिक वृद्धांना होणार आहे. आत्तापर्यंत या योजनेत केवळ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचा समावेश होता. परंतु वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही.

असा मिळणार योजनेचा लाभ

या योजनेत वृद्ध व्यक्तींना आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे. ज्या कुटुंबाला आयुष्यमान योजना अजून लागू झालेली नाही त्यांना स्पेशल कार्ड 29 ऑक्टोंबरपासून मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काही ज्येष्ठ सदस्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान कार्ड दिले. आयुष्मान कार्ड बीआयएस पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ किंवा आयुष्मान ॲपद्वारे मिळेल. त्यासाठी वृद्धांना त्यांचे आधार कार्ड आणि केवायसी देखील अपडेट करावे लागेल. ज्या वृद्धांकडे खाजगी आरोग्य विमा आहे त्यांना खाजगी आणि आयुष्मान भारत योजना विमा यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.

 

Maharashtra14 News

Recent Posts

पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांचा भर; अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे निर्देश

*आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्राची पाहणी* *पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर; अतिक्रमणांवर…

2 days ago

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ मे २०२६ –* मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे…

3 weeks ago

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22 मे -- ​पिंपरी-चिंचवड: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण…

3 weeks ago

सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्‌’ कर आकारणी रद्द करा! – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी – महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 मे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोसायट्यांमधील…

4 weeks ago

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये…

1 month ago