Categories: Uncategorized

ब्रेकिंग न्युज : आमदार शंकर जगताप यांचे कट्टर समर्थक … पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट नेते पदी नगरसेवक “श्री प्रशांत कृष्णराव शितोळे” यांची एकमताने निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३१ जानेवारी : मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये महापालिका निवडणूका (PCMC Election 2026) पार पडल्या आहेत. २९ महापालिकांसाठी मतदान पार पडले असून भाजपला भरघोस यश मिळाले. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये  भारतीय जनता पार्टीचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आलेले आहेत. या सर्व नगरसेवकांची दि. ३०/०१/२०२६ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये  नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी गटास एकत्रित मान्यता देऊन ठराव एकमताने मंजूर केलेला आहे. तसेच या ८४ नगरसेवकांचा ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ अशा प्रकारचा गट स्थापन करण्याबाबत देखील ठराव मंजूर करण्यात आला आहे.

तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्र.३२-ड सांगवी मधून निवडून आलेले व या महानगरपालिका निवडणुकीत  भाजपा मध्ये नुकताच प्रवेश करून निवडून आलेले तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांचे कट्टर समर्थक नगरसेवक प्रशांत कृष्णराव शितोळे यांची भाजपच्या गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.  प्रशांत शितोळे यांनी याअगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष पदही भूषविले आहे. त्याप्रमाणे सदर गटाचे मा. विभागीय आयुक्त, पुणे, व मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडे नोंदणी करण्याबाबत ठरविण्यात आलेले आहे. असे पत्र महाराष्ट् भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. या निवडीमुळे आमदार शंकर जगताप यांच्या गटाची ताकत  वाढल्याचे बोलले जात आहे.

शुक्रवारी झालेल्या बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ या नावाने अधिकृत गट स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महापालिकेत भाजपचा सर्वात मोठा गट स्थापन झाल्याने आगामी महापौर, उपमहापौर तसेच विविध स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी भाजपचेच नगरसेवक नेमले जाणार आहेत हे मात्र नक्की झाले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

4 weeks ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

4 weeks ago

४ वर्षांनं प्रशासकीय राजवट संपुष्टात.! पिंपरी चिंचवड’च्या महापौर पदी रवी लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर…

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड*…

1 month ago

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी नंतर पिंपरी चिंचवडमधील विकासकामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी “मॅरेथॉन बैठक” घेत शहरातील नागरिकांसाठी केल्या या मागण्या

किवळे, रावेत, मामुर्डी आणि  पुनावळ्यातील रस्त्यांसह ''पब्लिक अमेनिटीज'' विकसित करण्याची प्रशासनाला सूचना सांगवी आणि औंध उरो…

1 month ago

पिंपरी चिंचवड युवा सेनेची आदरांजली … विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ फेब्रुवारी : पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

1 month ago