Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदी भाजपच्या रवी लांडगे यांची वर्णी तर उपमहापौर पदी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०२ फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड महापौर पदी भाजपच्या रवी लांडगे यांची वर्णी लागणार हे निश्चित झालं. रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झालेत. त्यामुळं ते महापौर पदाचे प्रबळ दावेदार होते. आज अर्ज दाखल करताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुला होताच शहराच्या राजकारणात एकच नाव ठामपणे पुढे येत आहे ते म्हणजे भाजपाचे दोनवेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून २०१७ आणि २०२६ असे सलग दुसऱ्यांदा रवि लांडगे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे चुलते कै. अंकुशराव लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष होते. त्यांनी पिंपरी-चिंचवडवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असताना भाजपाला उभारी दिली होती. आता भाजप कडून रवि लांडगे यांचा महापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. भाजपाचे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर उपमहापौर पदासाठी प्राप्त झालेले अर्ज  वैशाली जालिंदर काळभोर – (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – प्रभाग क्र. १४ यांनीही अर्ज दाखल केला आहे.

यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अभिषेक बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले,
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला शहरातून घवघवीत यश मिळाले. नागरिकांनी भाजपवर एक हाती विश्वास सोपवला आहे. हा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी आता प्रत्येक नगरसेवकाची आहे. “जबाबदार पालक” या नात्याने प्रत्येक नगरसेवक आता काम करणार आहे. भाजपचे शिस्त, संघटन आणि साधनसुचिता या सर्व गोष्टींचे पालन करण्यासाठी महापालिकेचे सभागृह हे अंतिम असेल. या सभागृहातून शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम आगामी काळात महापौर म्हणून रवी लांडगे करतील असा विश्वास असल्याचे आमदार जगताप म्हणाले.
……………………….

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार  नगरसेवक रवि बाबासाहेब लांडगे यांनी पक्षाच्या वतीने ‘‘महापौर’’पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी शर्मिलाताई बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणी व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत सर्वंकष विकास केला जात आहे. विकासाची ही घोडदौड कायम राखण्यासाठी महापालिका सभागृह हे अंतिम असणार आहे. सभागृहातील निर्णय नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुविधेसाठी घेतले जातील. हा विश्वास महापौर या नात्याने रवी लांडगे आणि, उपमहापौर म्हणून शर्मिला बाबर ठामपणे सार्थ ठरवतील.

शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago