Categories: Uncategorized

दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं … जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 फेब्रुवारी :  पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत पसरत असताना पिंपरी चिंचवड दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे.

जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीच आरोपीला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. काय आहे घटना? पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या सुमारास जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली.

शहरातील दापोडी परिसरात ही घटना घडली. या घटनेत 61 वर्षीय शंकर नारायण काटे आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी संगीता काटे यांचा जागीच मृत्यू झाला. 45 वर्षीय आरोपी प्रमोद मगरुडकर खून करून मयत दाम्पत्याच्या रक्ताने माखला होता. तो स्वतःही जखमी झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत हातात टिकाव घेऊन रस्त्याने फिरत असताना नागरिकांनी त्याला पकडले आणि घटनेबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याने दोघांचा खून का केला? याचा तपास भोसरी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

4 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago