Categories: Uncategorized

‘ना नेता ना पक्ष’ ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे : राहुल कलाटे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ फेब्रुवारी २०२३) : चिंचवड विधानसभा निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपल्या मतदार संघात प्रचारा दरम्यान बोलताना राहुल कलाटे म्हणाले, ” निष्ठुर भाजपने सहानुभूती या शब्दाचा गळा घोटला आहे. त्यामुळे त्यांना लोकांची सहानुभूती मुळीच मिळणार नाही, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केले. चिंचवडचा विकास केला म्हणणाऱ्यांनी आधीच विकास झालेल्या भागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केल्याचा केवळ भास निर्माण केला हे न ओळखण्याइतकी जनता दूधखुळी नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

महाविकास आघाडीच्या वतीने राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिट्टी या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे.

राहुल कलाटे म्हणाले की, चिंचवडमधील जनता माझ्याबरोबर आहे, या आधीच्या निवडणुकांचा निकाल पाहिला तर जनता मला नक्कीच संधी देईल. ‘ना नेता ना पक्ष’ ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. चिंचवडची जनता मलाच कौल देईल असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला. आता या तिहेरी लढतीचा फायदा भाजपला होईल असे बोलले जाते त्याबद्दल विचारले असता तिहेरी लढतीचा फायदा सक्षम उमेदवार म्हणून मलाच होईल, असे कलाटे म्हणाले. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना सहानुभूती असल्याकडे लक्ष वेधले असता कलाटे म्हणाले की, मलाही सहानुभूती आहे. सन २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मी लक्षणीय मते घेतली आहेत. त्यामुळे आता मला सहानुभूती मिळेल. मागील निवडणुकीत मतदारांनी खुद्द लक्ष्मण जगताप समोर असताना मला एक लाख बारा हजार मते दिली होती; याची आठवण कलाटे यांनी यावेळी करून दिली.

वाकडमध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण अनेक विकास कामे मंजूर करून आणली व मार्गी लावली. या उलट भाजपने बंद जलवाहिनी प्रकल्प, रेड झोन सारखे प्रश्न लोंबकळत ठेवले आहेत. हे जनतेला पक्के माहित आहे त्यामुळे यावेळी चिंचवड मतदार संघात इतिहास घडेल व सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

चिंचवडचा विकास केला असा दावा करणाऱ्या मंडळींनी स्मार्ट सिटी अंतर्गत काय विकास केला हे चिंचवड मतदार संघातीलच नव्हे तर अख्ख्या पिंपरी चिंचवड मधील जनतेला माहित आहे. आधीच विकसित झालेल्या भागावर उधळपट्टी करण्याऐवजी रहाटणी ,काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी सारख्या भागाचा विकास केला असता तर मतदार संघाचा समतोल विकास झाला असता, असे कलाटे म्हणाले.

 

Maharashtra14 News

Recent Posts

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

2 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

2 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

3 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

3 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

2 months ago