महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) : नवीन वर्षात जानेवारी महिन्यातला पहिला सण हा मकर संक्रांतीचा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमी पर्यंत घरोघरी हळदी कुंकुचे कार्यक्रम चालू असतात. या सणानिमित्त महिलांमध्ये तर मोठा उत्साह असतो. तर नववधूंसाठी हा सण खास असतो. या सणाला हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत असते. त्यामुळे घरोघऱी हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात.
मग यंदाही हळदी कुंकवासाठी असाच एक आगळावेगळा हळदीकुंकू कार्यक्रम नवी सांगवी, कृष्णा चौक येथील ‘सोनिगरा ज्वेलर्स‘ यांनी आपल्या ज्वेलर्सच्या दालनात दि.२५ व २६ जानेवारी रोजी स. ११ ते सं. ०५ पर्यंत आयोजित केला आहे. त्यांनी आपल्या परिसरातील महिलांना भगिनींना हळदी कुंकू समारंभास आमंत्रित केले आहे.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदीकुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदीकुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे.
पिंपरी चिंचवड शहरात नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात सोने चांदी च्या व्यवसायात प्रसिद्ध असलेले सोनिगरा ज्वेलर्स यांनी या मकर संक्रातीनिमित्त सोनिगरा ज्वेलर्स च्या वतीने हळदी कुंकू महा- उत्सवमध्ये सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक वाण अशी योजना त्या निमित्ताने परिसरातील महिलांकरीता ठेवण्यात आली आहे.
हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे
होय.
** वाण देणे
वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…