Categories: Uncategorized

पद्मश्री बी. जी. शिर्के यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांकरीता मदतीचा हात

महाराष्ट्र व14 न्यूज, (दि.०९ ऑगस्ट)  : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना बी. जी. शिर्के कंपनीतील अधिकाऱ्यांच्या वतीने २५००० रुपयांचा मदत निधीचा धनादेश खालापूर येथील नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे नुकताच सुर्पूत करण्यात आला.

यावेळी पद्मश्री बी. जी. शिर्के यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांकरीता मदतीचा हात पुढे करीत आपण समाजासाठी काही देणे लागतो. या उदात्त भावनेतून ही मदत करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महाव्यवस्थापक नितीन कदम, उपमहाव्यवस्थापक केशव लावंड, प्रमोद पवार, विजय बांदल यांच्या प्रयत्नातून सर्व स्टाफ व कर्मचारी यांनी स्वतः च्या पगारातून रक्कम स्वरूपात निधी एकत्रित गोळा करून धनादेश द्वारे खालापूर येथील नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रविण शिर्के यांनी यशस्वीपणे पार पाडले.

बी जी शिर्के कंपनीच्या पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागातील मारुती गाढवे, महादेव कदम, मारुती आडलिंगे, राम पाखरे, देवेंद्र सोनार, अतुल राऊत, नवी मुंबई विभागामधील श्रीनिवास मेटे, प्रशांत काळे, अनिकेत काळे, किरणकुमार मोरे, अशोक जगदेव, विशाल सोनवणे आदी अधिकारी वर्ग तसेच स्टाफ याप्रसंगी उपस्थित होता.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago