महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी) : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या पाच निवडणुकांपैकी कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिला विजय नोंदवला आहे.
औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदार संघ आणि नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पाचही मतदार संघात कुणाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पैकी कोकण शिक्षक मतदार संघाचा निकाल हाती आला आहे. यात भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत.
भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
आम्ही बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, असा काही निकाल लागला असेल तर तो धक्का आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…