Categories: Editor Choice

युक्रेन” देशात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी / नागरिकांचा अहवाल सादर करा … पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, ७ मार्च २०२२ : रशिया व युक्रेन या देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर युक्रेन या देशात शिक्षण व इतर कामासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी / नागरिकांना त्वरित भारतात आणणेबाबत भारत सरकार द्वारा “ऑपरेशन गंगा” अभियान सुरु करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत भारतात काही विद्यार्थी / नागरिक यांना सुरक्षित परत आणण्यात आले असून काही प्रमाणात लोक युद्धग्रस्त देशात अडकून पडलेले आहेत. या विद्यार्थी / नागरिकांना देशात परत आणण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना सुरु आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या शहरातील विद्यार्थी व नागरिकांची माहिती संकलित करून मनपा प्रशासनाकडे दोन दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष (मंत्रालय), महाराष्ट्र राज्य यांचे द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना प्राप्त अद्ययावत यादीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील काही विद्यार्थी / नागरिक सदर युद्धग्रस्त देशात शिक्षणाकरिता गेलेले आहेत. यापैकी काही भारतीय विद्यार्थी / नागरिक भारत सरकार द्वारा “ऑपरेशन गंगा” अभियानांतर्गत आपल्या घरी परत आले आहेत. तसेच, काही नागरिक शेजारील देशात, आपले नातेवाईकांकडे सुरक्षित स्थलांतरीत झालेले आहेत,तर अजून काही नागरिक अद्याप भारतात परतलेले नाहीत. अशा नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडून प्राप्त झालेली आहे.

या सर्व विद्यार्थी / नागरिक यांचे पालक अद्याप मानसिक तणावाखाली आहेत. सदर नागरिकांची माहिती घेवून क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या विद्यार्थी / नागरिकांच्या घरी तातडीने क्षेत्रीय अधिकारी यांनी समक्ष जाऊन त्यांना मानसिक आधार व आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच, सदर कार्यवाहीचा अहवाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांचेकडे दोन दिवसांत सादर करून याची प्रत अतिरिक्त आयुक्त (१) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागास सादर करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 hours ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

3 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

3 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

4 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 days ago