Categories: Uncategorized

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना  मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शेवटच्या चार दिवसांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार  करून पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी आपापल्या  बुथवर “मेरा बूथ सबसे मजबूत” संकल्पना राबविणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक बूथ जिंकण्यासाठी विजयी 51 टक्के मतदान होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार अश्विनीताई जगताप, चिंचवड विधानसभा निरीक्षक जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, मावळ लोकसभा विस्तारक भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक सागर फुगे,  चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांना पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदार संघातून दीड लाखाहून अधिक मताधिक्य देवून निवडून आणण्यासाठी भाजपने बूथ स्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे. बूथनिहाय मतदार चिठ्ठ्या वाटणे, बूथ प्रतिनिधी,  मतदारांसाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मंडल अध्यक्ष, बूथ समिती तसेच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

6 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago