Categories: Editor Choice

जागतिक महिला दिनानिमित्त आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्याकडून शुभेच्छा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ मार्च) : महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे.

महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढं नेण्याचं काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केलं आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्रकन्या आज आपलं कर्तृत्वं सिद्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करुया. स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया, अशा शब्दात चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करुन महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रानंही वेळोवेळी महिला धोरण लागू करुन राज्यातील महिला शक्तीला विकासाची संधी दिली. नोकरीत, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल्यानं अनेक माता-भगिनी राजकारण, समाजकारणात आता सक्रीय झाल्या आहेत. उद्योगजगतात जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचं योगदान महत्वाचं ठरत आहेत.

राज्याच्या घराघरातली, गावखेड्यातली स्त्रीशक्ती ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. या स्त्रीशक्तीला अधिक सक्षम, समर्थ, स्वावलंबी करुन बलशाली महाराष्ट्र घडवूया असं आमदार लक्ष्मण जगताप यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago