Categories: Uncategorized

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. सुजय विखे पाटलांचा प्रचार करताना अजित पवारांनी निलशे लंके यांना थेट इशारा दिला आहे. अजित पवारांचं भाषण सुरू असताना पावसाला सुरूवात झाली, पण तरीही अजित पवारांनी त्यांचं भाषण सुरूच ठेवलं.

‘मार्केट कमिटीमध्ये जर कुणीही चुका केल्या असतील तर, माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची मार्केट कमिटी आहे. कुणाच्या बापाच्या घरची नाही, त्यामुळे त्याची इनक्वायरी होईल. कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही. कुणी तिथे पैसा खाल्ला असेल तर अशांना चक्की पिसिंग ऍण्ड पिसिंग’, असा इशारा अजित पवारांनी दिला.

‘मागच्या वेळी आमदारकीच्या वेळीस माझीही चूक झाली. मला निलेशने सांगितलं की मला तुमच्या पक्षामध्ये घ्या. आमची इकडे चार दिशेला चार तोंडं होती. या सगळ्यांना एकत्र आणणं मला महाकठीण गेलं होतं. अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला तिकीट द्या. तुमच्यातले अनेक जण तेव्हा आले होते. तुमच्या प्रेमाखातर तुमच्या आग्रहाखातर मी त्याला उमेदवारी दिली. मला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावेल’, असा टोला अजित पवारांनी निलेश लंकेंना लगावला.

‘गडी दिसायला दिसतो बारका, पण लय पोहोचलेला आहे. मी त्याला विकासकामाकरता निधी द्यायचो. मला एक दिवस घरी घेऊन गेला, किती साधं घर आहे. कसे माझे आई-वडील आहेत, कसा माझा प्रपंच आहे, सगळं दाखवलं. मला वाटलं काम करतोय, पण नंतर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. आमदार झाल्यावर लोकांना दमदाटी करायची. महाविकासआघाडीचे उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांना उघड धमक्या देत आहेत’, असं अजित पवार म्हणाले.

‘कलेक्टरना मान द्यायचा असतो त्यांना ए कलेक्टर म्हणतो, पोलिसांना तुमचा बाप येतो म्हणतोय. अरे बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे. तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो. तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर येईल. अजित पवारच्या नादी लागू नको. जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती है. तू काय समजतोस स्वत:ला. मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावला तर तुला बघून घेईन’, असा थेट इशारा अजित पवारांनी निलेश लंकेंना दिला.

‘आचारसंहिता संपल्यानंतर मी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आता तर तो आमदारही नाही, त्याची अरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही’, असं अजित पवार म्हणाले. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार पारनेरमध्ये आले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

5 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

6 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

7 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

1 week ago