Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १९ मधील पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिकांचे हस्तांतरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.७ मार्च २०२२) : घर म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आणि प्रत्येकाचे आपले स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते ते आज प्रत्यक्ष साकारले जात असल्यामुळे समाधान वाटत आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १९ मधील पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिकांचे हस्तांतरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास आमदार आण्णा बनसोडे, प्रभाग अध्यक्ष शैलेश मोरे, नगरसदस्य शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे, माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते दिपक मेवानी, रमेश शिंदे, प्रवीण वडमारे, प्रताप खैलारीया, अविनाश इंगवले, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा इंगवले उपस्थित होते.,

महापौर माई ढोरे म्हणाल्या, आपली महानगरपालिका श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते.या औद्योगिकनगरीत जास्तीत जास्त नागरिकांना घरे देण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. आपले स्वत:चे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी लाभदायक असते, आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे असे सांगून नागरिकांच्या सोयीसाठी मोकळ्या जागेत वाचनालये, उद्याने तसेच सुसज्ज दवाखाने, रुग्णालये उभारण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार आण्णा बनसोडे यांनी पुनर्वसन प्रकल्पाची योजना चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महापालिकेने लिफ्ट सारख्या सुविधा लाभार्थ्यांना पुरवाव्यात असेही ते म्हणाले.

जेएनयूआरएम बीएसयूपी शहर झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत लिंक रोड पत्र शेड येथे ६७२ सदनिका बांधण्यात येणार आहेत. हा प्रकल्प ६ इमारतींमध्ये राबविण्यात येत आहे. त्यापैकी इमारत क्र. सी या एका इमारतीच्या १०७ सदनिका बांधून पूर्ण झाले असल्याने त्यांच्या वाटपाची सुरुवात आज करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते अशोक वाघमारे, शहानवाज शेख, बसवंत चंदनशिवे, गौतम बनसोडे आणि गणपत गायकवाड यांना सदनिकांच्या किल्ल्या आज प्रदान करण्यात आल्या असून उर्वरीत सदनिकाधारकांना लवकरच ताबा देणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी दिली.

नगरसदस्य शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

11 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

18 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago