Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लावणार दर १० मीटरला एक देशी झाड! शहर हरित करण्यासाठी महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर देशी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काही भागात विकसित झालेल्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे दिसून येत नव्हती. त्या अनुषंगाने पावसाळ्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे.

निगडी प्राधिकरणाप्रमाणेच शहरातील इतर भागातील बीआरटी तसेच अन्य विकसित रस्त्यावर हिरवेगार वृक्ष असावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील ज्या रस्त्यांवर हरित आच्छादनाचे प्रमाण कमी आहे, अशा रस्त्यांना वृक्षारोपण करताना प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांवर पदपथ शेजारील जागांमध्ये दर दहा मीटर अंतरावर पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर व स्थानिक हवामानाशी सुसंगत अशा देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

याशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक मोकळ्या जागांवरदेखील वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहर हिरवेगार व निसर्गसंपन्न करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे.
…..

*या वृक्षांची करण्यात येत आहे लागवड*

रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या देशी प्रजातींच्या वृक्षांमध्ये कडुलिंब, ताम्हण, कदंब, वड, पिंपळ, आकाशनीम, बकुळ, अर्जुन, मोहगणी, सोनचाफा, पारिजात अशा वृक्षांचा समावेश आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांना बांबू ट्री गार्ड तसेच आवश्यकतेनुसार लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आले आहेत. तसेच या वृक्षांच्या देखरेखीच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे.
…..
*प्रभागनिहाय रस्ते व पदपथ येथे केलेले वृक्षारोपण*
(आकडेवारी ३१ जुलै २०२५ पर्यंतची)
• अ प्रभाग : २०१
• ब प्रभाग : ९१०
• क प्रभाग : २०४८
• ड प्रभाग : ६५०
• ई प्रभाग : ७३१
• फ प्रभाग : ४६५
• ग प्रभाग : २३०
• ह प्रभाग : २०६
…..

रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर वृक्षारोपण केल्याने आपले शहर हरित व सुंदर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
…..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहराच्या हरित आच्छादनात लक्षणीय वाढ होईल. तसेच प्रदूषण नियंत्रण, तापमान कमी होणे आणि पर्यावरणस्नेही शहर निर्माण करण्यास मदत होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. सध्या जे रस्ते विकसित झाले आहेत, तेथे प्रत्येक दहा मीटरवर वृक्षारोपण करण्यात येत आहे. याशिवाय आगामी काळात जे रस्ते विकसित होतील, तेथेही वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे. आपले शहर निसर्गसंपन्न व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago