Categories: Editor Choice

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दि.३ जानेवारी रोजी “महिला शिक्षण दिन” साजरा करण्याच्या अनुषंगाने  विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

 

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३१ डिसेंबर २०२२:- महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दि.३ जानेवारी २०२३ रोजी पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे “महिला शिक्षण दिन” साजरा करण्याच्या अनुषंगाने  विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

           पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिह यांच्या हस्ते दि.३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे , आमदार उमा खापरे, लक्षण जगताप , संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक  उपस्थित राहणार आहेत.

            तत्पूर्वी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी १०.३० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.  त्यानंतर सकाळी १०.३५ वाजता तळमजल्यावर चित्रकार विजय शिंदे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.  सकाळी १०.४५ वाजता मोशी येथील महापालिकेच्या शाळेमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

            ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित विचार प्रबोधन पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी महिला बचत गट व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.  सकाळी ११.३० वाजता “मी तुमची सावित्रीबाई फुले” हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री नाट्यप्रयोग सुप्रसिध्द कलाकार मेघना झुझम या सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात १२.३० वाजता संगीत फ्युजन अविष्कारांसह “सावित्रीच्या ज्योती” हा सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिध्द कलाकार रितेश नगराळे सादर करणार आहेत.

 दुपारी २.०० वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अकोला येथील अनंत राऊत,  इचलकरंजी येथील रोहित शिंगे, सोयगांव येथील डॉ.स्वप्निल चौधरी, पिंपरी चिंचवड येथील अनिल दिक्षीत, देहू येथील मेहमुदा शेख  हे कवी सहभागी होणार आहेत.  दुपारी ४.३० वाजता  “सावित्रीच्या लेकी” या विषयावर आधारीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्त्या अॅड. मनिषा महाजन, पत्रकार अश्विनी सातव डोके,   अॅड. निशा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत “वंदन ज्ञानज्योतीला” या संगीतमय कार्यक्रमाद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वाची सांगता होणार असून यामध्ये सुप्रसिध्द गायक सुधाकर वारभुवन, मारुती जकाते, सागर येल्लाळे, अनिरुद्ध सूर्यवंशी हे कलाकार सहभागी होणार आहेत.  नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.   

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…

16 hours ago

शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम .. काव्यशायराना’तून समतेचा संदेश; वसीम बरेलवी यांच्या शायरीने रंगली मैफल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ एप्रिल २०२६ – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम…

4 days ago

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२६ :* बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा…

5 days ago

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

1 week ago