हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळत असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता-लढता मरण पत्करणे योग्य ठरेल.-स्वातंत्र्यवीर सावरकर
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंती निमित्त राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, संस्कार भारती व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २८ मे या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह आयोजित केला आहे. याच सप्ताहातील एक कार्यक्रम गुरुवार दि. २५ मे २०२३ निळू फुले नाट्य मंदिर, पिंपळे गुरव वेळ सायं. ६.३० वाजता विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाअंतर्गत विविध माध्यमातून सावरकर विचारांचा जागर करण्यात येणार आहे.
” शब्द, संगीत व काव्यातून उलगडलेले एक ओजस्वी जीवनदर्शन…!” तेजोनिधी सावरकर या कार्यक्रमास अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप आमदार चिंचवड विधानसभा, ज्येष्ठ बासरीवादक पं. केशवजी गिंडे, शास्त्रीय गायक पं. सुधाकरजी चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे.
तर या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना- मिलिंद कांबळे, निवेदन- रविंद्र खरे गायक आनंद तेलंग, अभयसिंह वाघचौरे, मिलिंद कांबळे, मिता वैद्य कानडे, स्वराली लेले, मधुरा तेलंग, शाहीर जालिंदर शिंदे साथसंगत हार्मोनियम- सोमनाथ जायदे, तबला-केदार तळणीकर, सिथेसायझर ओंकार पाटणकर, तालवाद्य- उद्धव कुंभार, बासरी – सिद्धांत कांबळे, नृत्य-मेघा कुलकर्णी व सहकारी यांनी केली असून ” शब्द, संगीत व काव्यातून उलगडलेले एक ओजस्वी जीवनदर्शन…!”तेजोनिधी सावरकर हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे,.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…