Categories: Uncategorized

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवडसह ३१७ तालुक्यांमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना’ उपक्रमाचा प्रारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आजपासून सुरू करण्यात आली. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ”  शुभारंभ शासन स्तरावरुन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला .

तसेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “ हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ”  शुभारंभ सावतामाळी मंदीर, चिखली घरकुल, प्राथमिक शाळा, जाधववाडी येथे करण्यात आला.  यावेळी  अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके,माजी महापौर राहुल जाधव आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे विस्तार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्या – त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसमवेत सहभागी झाले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago