Categories: Uncategorized

‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने … आज देहूत वारकरी बांधवांकरीता मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप … हजारो वारकऱ्यांनी घेतला या आरोग्य सेवेचा लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार झाली. देहू-आळंदीत राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखीने शनिवारी दुपारी अडीच वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

देहूत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असल्याने त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे.

पिंपरी चिंचवड येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट -लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने वारकऱ्यांकरिता मोफत आरोग्य सेवा या वारी काळात पुरविण्यात येणार आहे, त्याचा प्रारंभ आज देहू येथून करण्यात आला.

पुणे ते पंढरपूर संपूर्ण पालखी महामार्गावर वारकरी बांधवांना चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट – लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने ही आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून हे सर्व डॉक्टर पुणे ते पंढरपूर पालखी मुक्कामी वारकऱ्यांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा आणि औषधे संपूर्णपणे मोफत पुरवणार आहे.

आज देहू येथून पालखी प्रस्थानाकरिता आलेल्या हजारो वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभघेतल्याचे यावेळी पहायला मिळाले. यात महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, मायमर मेडिकल कॉलेज – तळेगाव  चे डॉक्टर तसेच डॉ. देवीदास शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग होता, लाभ घेणाऱ्यामध्ये यात जेष्ठ वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यामध्ये वारकऱ्यांना सर्व प्रकारची औषधे ट्रस्टच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी ही आरोग्य सेवा पालखी काळात पुरवली जाते, वारकऱ्यांना पालखी मार्गात प्रवास करत असताना ऊन, वारा, पाऊस अशा अनेक अडचणींचा सामना करावा त्याकाळात ही चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टरांनी केलेली सेवा त्यांना वरदान ठरत असते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago