Categories: Uncategorized

०३ ऑक्टोबर रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्वनियोजित पादुका दर्शन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ सप्टेंबर) : सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चालला आहे. विज्ञानामुळे भौतीक सुखांची मांदियाळी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. एका अर्थाने माणसाची प्रगतीच होत आहे. हे जरी खरे असले तरी सुखाच्या हिरवळीवर लोळण घेणारा माणूस अंतःकरणातून मात्र कधी कधी हताश, निराश झालेला आढळतो. कारण आहे मनःशांतीचा अभाव, आत्मिक सुखाचा अभाव, भौतिक सुखे कितीही असली तरी आत्मिक समाधान हे काही वेगळेच असते. आत्मिक समाधानाशिवाय जीवाला पूर्ण समाधान मिळत नाही. यासाठी सांप्रत काळात गुरुमार्गाने जावून आत्मोन्नती साधता येते. ज्यांना ही उच्च कोटीची पर्वणी साधायची नसेल त्यांनी गुरूमार्गाने आत्मिक सुख, मनःशांती मिळवायला काय हरकत आहे … या करिताच भाविकांनी ही या उपासना कार्यक्रमात उपस्थिती लावून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा, याकरता पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमआयोजित करण्यात आला आहे.

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्वनियोजित पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम

दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता मू. पो. शिक्रापूर, चाकण चौक, पुणे नगर रोड, बजरंगवाडी, तालुका शिरूर जिल्हा पुणे

येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तांची गर्दी होणार आहे.

दिनांक ०३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता जगद्गुरु श्रीच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक, संत पिठावर आगमन , सामाजिक उपक्रम निराधार महिलांना २५ शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे गुरुपूजन , आरती , प्रवचन , उपासक दीक्षा , दर्शन व पुष्पवृष्टी असा एक दिवसाचा जगद्गुरुश्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम होत आहे.

दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे, भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्व – स्वरूप संप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे.

*जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था लोक उपयोगी उपक्रम* *1)शैक्षणिक उपक्रम* : गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य
*2) वैद्यकीय उपक्रम* : संस्थांच्या वतीने 42 ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे 24 तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे
*3) कृषी विषयक उपक्रम* :
गोर गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खाते औषधे शेती अवजारे वाटप केली जातात
*4) आपत्कालीन मदत उपक्रम* : दुष्काळ पडल्यास संस्थांच्या वतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो
*5) अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम* :
अंगारे दोरे धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते
*6) दुर्बल घटक मदत उपक्रम* :
निराधार महिलांना घरघंटी शिलाई मशीन शेळ्या मेंढ्या दूपत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते, अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात.

“तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन”, जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज

Maharashtra14 News

Recent Posts

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांची पुण्यात शंभरी पार, कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ जानेवारी : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चं थैमान वाढत असल्याचं पाहायला मिळत…

4 days ago

पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर, नव्या सुनावणीची नवी तारीख, कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्र 14 न्यून, दि. २८ जानेवारी : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची…

4 days ago

नवी सांगवी च्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -26 जानेवारी 2025) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित,…

6 days ago

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 weeks ago