महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ जानेवारी) : दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने चिंचवडची पोटनिवडणूक घड्याळ या पक्षचिन्हावर लढण्याचा ठराव केला आहे. त्यातून भाजपला बाय देण्याचा त्यांचा मनोदय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त आता यावर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका काय राहते, याकडे चिंचवडच नाही, तर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. परंतु आ. अण्णा बनसोडेंनी व्यक्त केलेल्या भावनेचा आदर आहे, असे सांगतानाच पंढरपूरला वेगळा न्याय आणि चिंचवडला वेगळा न्याय असे होत नाही, असे स्पष्ट करीत काटेंनी बनसोडेंच्या मताशी असहमती दर्शवली. परंतु काहीही असो पिंपरी चिंचवड च्या घड्याळाचे काटे कसे फिरवायचे याची चावी दादा-साहेब पवारांकडे आहे हे वेगळे सांगायला नको…!
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार असेल, तर ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काल (ता.२१) मांडली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटातटाचे मोठे वादंग दिसायला लागले आहे. तर सोशल मीडियावर “कपटी मित्रापेक्षा, दिलदार शत्रू बरा” ..! अशी पोस्ट व्हायरल व्हायला लागली आहे.
या पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद थेट आगामी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवर पडणार असल्याने ती कुठल्याही परिस्थितीत लढविण्य़ाचा चंग शहर राष्ट्रवादीने बांधलेला आहे. पालिकेतील पराभवाचा बदला घेतल्याशिवाय तो आता शांत बसणार नाही. आता फक्त लढायचे आणि जिंकायचे हेच ध्येय आमच्यापुढे आहे, असा निर्धार व्यक्त करतानाच दुसरीकडे मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, असेही काटे यांनी प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.
आता यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल, की ही सर्व बडबड आणि धडपड वायफळ ठरतेय का? मात्र तत्पूर्वी या इच्छुकांच्या भाऊगर्दीत उमेदवारीसाठी नेमकी कोणाची लॉटरी लागणार? हे सुद्धा पाहाणे तेवढेच मनोरंजक ठरणार हे मात्र नक्की. कारण पिंपरी चिंचवडच नव्हे तर राज्यातील राष्ट्रवादी ची सूत्रे कुठून फिरतात हे जनता जाणते, त्यामुळे देखो आगे आगे होता है क्या ..?
स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी नेहमीच कार्यकर्त्यांवर भरभरून प्रेम केले. प्रत्येकसंकटात वेळोवेळी ते कार्यकर्त्यांमागे मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाइतकेच सर्वसामान्य कार्यकर्त्याचेही कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम एकनिष्ठ राहू, अशी भूमिका चिंचवड मधील त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटूंबियांवर प्रेम करणाऱ्या पक्षातील आणि पक्षाबाहेरील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…