Google Ad
Uncategorized

नवी सांगवी आणि पिंपळे गुरव मधील नागरिकांना येथे मिळणार मोफत युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) आणि कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : राष्ट्रवादी काँग्रेस सांगवी पिंपळेगुरव ब्लॉक अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांच्या वतीने मोफत युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) आणि कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

कोरोनो प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सार्वजिनक वाहतुकीने प्रवास करणेसाठी जसे रेल्वे , बस , विमान आणि शासकीय व निमशासकीय कार्यालय , खाजगी शॉपींग मॉल , सिनेमागृह व इतर ठिकाणी प्रवेश मिळणेसाठी युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) दाखविणे आवश्यक आहे.

Google Ad

पात्रता अर्जदाराने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किमान १४ दिवसाचा कालावधी लोटलेला आवश्यक कागदपत्रे व माहिती
१ ) पिंपळे गुरव मतदार यादीत नाव असणे आवश्यक
२ ) पासपोर्ट साईज फोटो
३ ) लस घेताना नोंदणी केलेला मोबाईल नंबर

येथे मिळणार पास आणि प्रमाणपत्र :-

दिनांक १५ जाने२०२२ ते १९ जाने . २०२२
वेळ – सकाळी १० ते सायं . ०५ स्थळ- शुभारंभ बँकेटहॉल , जूनी धर्मवीर संभाजी बँक , क्रांती चौकाजवळ नवी सांगवी पुणे २७

या योजनेचा मोफत युनिव्हर्सल पास ( SMART CARD ) आणि कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन शिवाजी तुकाराम पाडुळे सौ . ऊमा शिवाजी पाडुळे यांनी परिसरातील नागरिकांना केलेआहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!