Google Ad
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मेट्रो सफर … मेट्रोतून प्रवास करुन घेतला कामाचा आढावा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जानेवारी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानक पुणे मेट्रोतून सफर केली. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. शरद पवार यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी ९ ते ९:३० च्या सुमारास अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचं काम किती झालं? कधीपर्यंत ऊर्वरित काम पूर्ण होईल? कामात काही अडथळा आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवारांनी घेतली. यावेळी पवार यांनी फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट देऊन फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास केला.
सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना नव्हती. तसेच, स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची माहिती ऐनवेळी सकाळी देण्यात आली होती. असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली.

Google Ad

पुणे मेट्रोचे दोन कॉरिडॉरमध्ये विभागणी करण्यात आली असून यामध्ये ३० स्थानकांचा समावेश आहे. पुणे मेट्रोची एकूण लांबी ३३.१ किमी असून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या कॉरिडॉर एकची लांबी १७.४ कमी आहे. यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा भुयारी मार्ग आहे. तर वानाज ते रामवाडी या कॉरिडॉर दोनची लांबी १५ किमी आहे. आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांसाठी प्राधान्य विभाग कार्यन्वित करण्यात येणार आहेत. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय हे प्राधान्य विभाग (मार्ग) आहेत.

पुणे मेट्रोच्या वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. नववर्षात ३ जानेवारीला बरोबर एक वर्षांनी ही दुसरी चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली होती. या महत्वपूर्ण चाचणीसाठी मेट्रोचे कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटरने चाचणीवेळी ट्रेन चालविली

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!