Categories: Uncategorized

महागनरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजला … 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महागनरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक ईव्हीएमवर होणार असून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी 39147 मतदान केंद्र असणार आहेत. यातील 10,118 मतदान केंद्र बीएमसीसाठी असतील. तर कंट्रोल युनीट 11,349 आणि बॅलेट युनीट 22000 असणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम –

नामनिर्देशन स्वीकारण्याचा कालावधी – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशन पत्राची छाननी – 31 डिसेंबर, 2025
उमेदवारी माघाराची मुदत – 2 जानेवारी, 2026
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी – 3 जानेवारी, 2026
मतदानाची तारीख – 15 जानेवारी, 2026
मतमोजणी – 16 जानेवारी, 2026

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago