महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेली पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी आणि दिमाखदार असलेली भव्य फुलपीच डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा “आमदार चषक २०२५” स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच याप्रसंगी मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील लुटला.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या शहरातील खेळाडूंनी जगाच्या पाठीवर क्रीडाक्षेत्रात भरारी घ्यावी हिच आम्हा सर्वांची इच्छा आहे. याच भावनेतून हि स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. उद्योगनगरी आणि स्मार्टसिटी बरोबरच या शहराला क्रीडानगरी हि ओळख मिळावी याकरिता आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्नशील असतो”. यापुढील काळात देखील या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करून खेळाडूंच्या क्रीडाकौशल्याला वाव देण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
सर्व खेळाडूंनी दरवर्षीप्रमाणे शिस्तप्रिय तसेच उत्कृष्ट क्रीडाशैलीने प्रदर्शन करून या स्पर्धेची लोकप्रियता आणि परंपरा जपावी अशी विनंती केली. तसेच स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री.अजय दुधभाते, श्री.निलेश जगताप, श्री.मनीष कुलकर्णी,श्री.प्रवीण वाघमोडे यांच्यासह सर्व संघांचे संघमालक आणि खेळाडूंचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आभार मानले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…