Categories: Uncategorized

मनोज सेठिया यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर अभियंतापदी पदोन्नती

महाराष्ट्र 24 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :-* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता (स्थापत्य) मनोज मोतीलाल सेठिया यांना ‘शहर अभियंता’ पदावर सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

महापालिका आस्थापनेवरील ‘शहर अभियंता’ पद दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रिक्त झाले होते. या पदावरील पदोन्नतीसाठी दिनांक १८ जून २०२६ रोजी पदोन्नती समितीची सभा घेण्यात आली. समितीने शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व तसेच शिस्तभंगविषयक बाबींची पडताळणी करून सेठिया यांच्या पदोन्नतीची शिफारस केली.

महापालिका सभा ठराव क्र. ४४, दिनांक २७ जानेवारी २०२६ अन्वयेही त्यांच्या पदोन्नतीस मान्यता देण्यात आली आहे.

ही पदोन्नती संबंधित न्यायालयीन प्रकरणे, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका तसेच संबंधित शासन निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित रिट याचिकांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली आहे.

शहर अभियंता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील विकासकामांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम दिशा मिळण्यास तसेच स्थापत्यविषयक कामकाजात प्रभावी समन्वय साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 week ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago