महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे मंदार महाराज देव यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले, आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊनही सांत्वन केले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्याबाबतचे वृत्त समजल्यानंतर मंदार महाराज देव यांनी जगताप कुटुंबियांना शोक संदेश पत्र देऊन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या शोक संदेशात मंदार महाराज देव यांनी म्हटले आहे, की “चिंचवड विधानसभा क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय आणि सामान्य जनतेला कायम हवेहवेसे वाटणारे कार्यसम्राट आमदार कै. लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांची प्राणज्योत दिर्घ आजाराशी झुंज देता देता मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी मालवली”.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मोरया भक्तांच्या सोयीसाठी चालु असलेल्या विविध विकासकामांमधे के. लक्ष्मणभाऊंचे चांगले सहकार्य लाभल्याने चिंचवड देवस्थान ट्रस्टचे त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. कै. लक्ष्मणभाऊ यांच्या निधनामुळे समस्त जगताप कुटुंबीयांवर दुःखाचाजो प्रचंड डोंगर कोसळला आहे त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे, पण भाऊंनी सामान्य जनतेच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले असेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता नकळतपणे आपणा सर्व जगताप कुटुंबीयांवर आली आहे. त्यामुळे या आभाळाएवढ्या दुःखातून सावरण्याची व सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे के. भाऊंचे स्वप्न पुर्ण करण्याची शक्ती आपणांस मिळावी हिच श्रीमोरया चरणी प्रार्थना.
दि. १४ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झालेल्या चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या मासिक सभेमधे कै.लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रध्दांजली आर्पण करून शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त श्री. मंदार महाराज देव, इतर विश्वस्त सर्व श्री श्री. जितेंद्र देव, ह.भ.प. आनंद तांबे, अँड राजेंद्र उमाप, श्री. विनोद पवार व सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हे आम्ही सर्व आपल्या दुःखात सहभागी आहोत.
कै. लक्ष्मणभाऊंच्या आल्यास चिरशांती लाभावी हिच मोरया चरणी प्रार्थना.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…