Categories: Uncategorized

विठ्ठल उर्फ नाना काटे अखेर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार … पोटनिवडणुकीकरीता अर्ज दाखल..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि ७) रोजी आपला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज थेरगाव निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, आरपीआय खरात गट, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २६ फेब्रुवारीला पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. सोमवारी भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी देखील डमी अर्ज सादर केला आहे. तर सोमवारपर्यंत १४ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) राहुल कलाटे हे देखील आज अपक्ष अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ही पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

राहुल कलाटे यांचाही उमेदवारीवर दावा :-

दरम्यान, महाविकास आघाडीचा घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल कलाटे यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांतील खलबतानंतर कलाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत खलबत सुरू होती. शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीकडून उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले.माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे यापैकी कोणाला महाविकास आघाडीचा फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच भाजपच्या अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी त्रिशंकू लढत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पहायला मिळणार का ते १० तारखेस समजेल.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago