Categories: Uncategorized

अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश! संजोग वाघेरेंना ठाकरेंकडून लोकसभेचं तिकीट…?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थ असलेले संजोग वाघेरे यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाताला शिवबंधन बांधून त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पन्नास खोके आणि इकडे स्कॉर्पियो बुलेरो लाथाडून Sanjog Waghere संजोग हे आमच्याकडे आले आहेत. त्यांना या परिवारात उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतले. आता आपल्याला लढायचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. मावळताना शिवसेनेचा सूर्य 2024 मध्ये तेजाने उगवताना दिसेल. मावळ मतदारसंघ आपल्याला परत खेचून आणायचा आहे. याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा, मातोश्रीचा अपमान केला, त्यांना आपली ताकद दाखवायची आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

उबाठाचे दिशादर्शक संजय राऊत!

यावेळी बोलताना संज्योग वाघेरे म्हणाले की, “माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम सुरु केला तेव्हाच मी भावूक झालो होतो. संजय राऊत मीडियाच्या माध्यमातून दररोज सकाळी काही ना काही दिशा देण्याचे काम करत असतात. मी पिंपरी-चिंचवडमध्ये चांगले काम करेन,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago