महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे जाणवत असून, अवघ्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गोळीबारीची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे एका युवकावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२२) दुपारी २:३० च्या दरम्यान २ अज्ञात आरोपींनी चिखली चौकात उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळ्या झाडल्या. सोन्या तापकीर असे गोळ्या झाडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, या गोळीबारीत तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आलीय.
काही दिवसापूर्वी तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या घालून, हत्या करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे.
टाळगांव चिखली येथील चौकात सोन्या तापकीर उभा असतांना; यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सोन्या गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, हल्ल्यातील जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेप्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…