Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली … तर विजय खोराटे नवीन अतिरिक्त आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जुलै) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यांच्या जागी सोलापूर महानगर पालिकेतील उपायुक्त विजय खोराटे या अभ्यासू अधिकाऱ्याची वर्णी लागली आहे

राज्यातील सत्तेत झालेल्या बदलाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना पहिला झटका बसला आहे. त्यांची राज्य शासनाने मुदतपूर्व बदली केली असून त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांची वर्णी लागली आहे. राज्याच्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलाचे हे पडसाद असल्याची चर्चा सुरू झाली असून जितेंद्र वाघ यांची बदली त्याचं अनुषंगाने असल्याचं बोललं जातय.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर सद्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त पदी असलेले वाघ हे अत्यंत कार्यकुशल आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांचा कार्यकाल संपन्या आधीच आज संध्याकाळी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आलंय, विशेष म्हणजे जितेंद्र वाघ यांना त्यांची सेवा त्यांच्या मूळ महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांच्या स्वाक्षरीने वाघ यांची बदली करण्यात आली .

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago