Google Ad
Uncategorized

बंदिस्त जागेत पैशावर तीन पत्ती जुगार खेळणार्यांना सामाजिक सुरक्षा पथकाने घेतले ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ जानेवारी) : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांना माहिती मिळाली की , भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत भिमराव भोसले चौक , नेहरुनगर , पिपंरी , पुणे येथील चव्हाण टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स चा मालक  चिंतामण चव्हाण हा त्याचे बंदिस्त असलेल्या लोखंडी कॅबीनचे ऑफिसमध्ये लोकांना एकत्र जमवुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी पैशावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळवित आहे . अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन मा . पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड यांनी त्यांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना सदर ठिकाणी तात्काळ टीम पाठवुन कारवाई करण्याचे आदेश दिले .

पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सामाजिक सुरक्षा विभाग पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी तात्काळ छापा टाकुन कारवाई करणेबाबत मार्गदशन करुन सुचना दिल्या . त्याप्रमाणे पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे व पोलीस अंमलदार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत भिमराव भोसले चौक , नेहरुनगर , पिपंरी , पुणे येथील चव्हाण टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स चा मालक नामे चिंतामण चव्हाण याचे बंदिस्त असलेल्या लोखंडी कॅबीनचे ऑफिसमध्ये रात्री २०:३५ वा चे सुमारास सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे . १ ) १५,००० / – रु रोख रक्कम २ ) ८० / – रु किं चे तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी वापरलेले सुट्टे पत्ते ३ ) ४१,००० / – रु किं चे ०७ मोबाईल जु.वा. किं.अं. असा एकुण ५६,०८० / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला.

Google Ad

१ ) चिंतामण सुरेश चव्हाण वय ३७ वर्षे रा . ए -१ , मंजील नेहरुनगर , साळवेकर हॉस्पीटल समोर , पिंपरी वाघेरे , पिंपरी , पुणे ( जुगार चालक – मालक ) २ ) शेखर सुरेश मोहिते वय ३३ वर्षे रा . विजय प्रभु हौसींग सोसायटी , पिंपरी , पुणे ( जुगार खेळी ) ३ ) इसाक इकबाल सय्यद वय ४८ वर्षे रा . भागिरथी कॉम्पलॅक्स , रेल्वे गेटसमोर , कासारवाडी , पुणे ( जुगार खेळी ) ४ ) रामकृष्ण उत्तमराव तुपे वय ४७ वर्षे रा . प्लॉट नंबर २ ९ १ , सेक्टर नंबर १ , इंद्रायणीनगर , महाराष्ट्र कॉलणी , भोसरी , पुणे ( जुगार खेळी ) ५ ) सुनिल मलीनाथ सोमासे वय ४६ वर्षे रा . सर्व्हे नंबर १०१ , डी डी पाटील चाळ , नेहरुनगर , शर्मा केबल शेजारी , पिंपरी वाघेरे , पिंपरी , पुणे ( जुगार खेळी ) ६ ) राजेंद्र शंकर सोमासे वय ४६ वर्षे रा . सर्व्हे नंबर १०१ , डी डी पाटील चाळ , नेहरुनगर , शर्मा केबल शेजारी , पिंपरी वाघेरे , पिंपरी , पुणे

७ ) आबासो बापुराव तुपे वय ३७ वर्षे रा . कर्मयोग हौसींग सोसायटी , कामगारनगर , पिंपरी , पुणे ( जुगार खेळी ) यांचेविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१/२०२२ महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त , श्री . डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) श्री . डॉ . काकासाहेब डोळे , मा . सहा . पोलीस आयुक्त डॉ . श्री . प्रशांत अमृतकर , पोलीस निरीक्षक श्री . देवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री . प्रदिपसिंग सिसोदे पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट , अमोल साडेकर , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , दिपक शिरसाट , अतुल लोखंडे , सोनाली माने यांनी केली आहे . ( श्री . डॉ . काकासाहेब डोळे ) पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) पिंपरी चिंचवड .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!