Google Ad
Uncategorized

पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा स्वर्णव अखेर आठ दिवसांनी सुखरूप सापडला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जानेवारी) : पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा स्वर्णव अखेर आठ दिवसांनी सापडला आहे. बाणेर बालेवाडी परिसरातून अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा पुनावळे परिसरात सुखरूप मिळून आला आहे. अपहरणकर्त्याने त्याला तेथेच सोडून पळ काढलाचा अंदाज आहे. मागील आठ दिवसांपासून पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांची पथके मुलाचा शोध घेत होते. पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी या घटनेवर जातीने लक्ष ठेवून होते.

पुनावळे येथील क्रिएटिव्ह ऑरचिड या सोसायटीचे सुरक्षा रक्षक दादाराव जाधव (वय ७०) यांच्याकडे आरोपीने मुलाला सोपवले व तेथून पळ काढला. जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून माहिती दिली. त्यानुसाद, वाकड आणि हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले.

Google Ad

डॉक्टर दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलाचे 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. घरासमोर मुलगा खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

स्वर्णवच्या अपहरणानंतर याबाबत चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. आता स्वर्णव सापडल्यानंतर पालकांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान, त्याचे कशासाठी अपहरण केलं, कारण काय पोलिस शोध घेत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं का केलं हे मात्र अजून कळू शकते नाही,त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!