महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑक्टोबर) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सन्माननीय पक्षश्रेष्ठींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे. पी. नड्डा जी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राज्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. तसेच सर्व पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेल्या या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो असेही ते म्हणाले.
आपल्या या विश्वासाला पात्र राहून, आगामी काळात मी चिंचवड मतदारसंघातील जनतेसाठी अतिशय कर्तव्यदक्षतेने आणि प्रामाणिकपणे कार्य करीन. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या आशीर्वादाने चिंचवड विधानसभेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अत्यंत उत्साहाने आणि प्रामाणिकपणे काम करेल. चिंचवडचा सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी माझे योगदान निश्चितच उल्लेखनीय असेल असा विश्वास यावेळी शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल भाजपा परिवार आणि महायुतीचे मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…