Categories: Uncategorized

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

 

यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा कार्यालयात फेरफटका मारावा लागत असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी, कर आकारणी विभागाने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

२०२२ ते जुलै २०२५ पर्यंत एकूण ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने थकबाकी नसल्याचा दाखला घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते घरबसल्या विना शुल्क दाखला डाउनलोड करू शकतात.

ऑनलाईन दाखला काढण्याची पद्धत:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्या. मुख्य पृष्ठावरील ‘नागरिक’ या पर्यायावर क्लिक करा आणि ‘मालमत्ता कर विभाग’ उघडा. त्यानंतर मालमत्तेला जोडलेला मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाका.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल. तो ओटीपी टाकाल्यावर, ‘कर थकबाकीदार नसल्याचा दाखला’ असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दाखला डाउनलोड होईल.

वर्षानुसार ऑनलाईन दाखले घेणाऱ्यांची संख्या:
२०२२- २३ : ४,७२५

२०२३- २४ : १६,९०६

२०२४-२५ :२९,७५७

२०२५- २६ (जुलै अखेरपर्यंत) :१३,२१३

महापालिकेच्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मालमत्ता कर विभागाने सुरू केलेली ‘थकबाकीदार नसल्याच्या ऑनलाईन दाखल्याची’ सुविधा हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना कोणतीही अडचण न येता आवश्यक कागदपत्रे सहज मिळावा, हाच आमचा उद्देश आहे.
प्रदीप जांभळे पाटील- अतिरिक्त आयुक्त पिंपरी- चिंचवड महापालिका

थकबाकीदार नसल्याचा दाखला ऑनलाईन मिळू लागल्यामुळे नागरिकांची खूप मोठी गैरसोय टळली आहे. आधी लोकांना कार्यालयात यावं लागायचं, वेळ जात होता, कागदपत्रांची दगदग होती – आता हे सगळं टळलं आहे. नागरिक घरबसल्या ही सेवा वापरत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ही सुविधा आणखी सोपी आणि उपयुक्त कशी करता येईल, यावर आमचा भर आहे.”
अविनाश शिंदे , सहाय्यक आयुक्त कर संकलन विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 week ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

4 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

1 month ago