Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरवमध्ये सोसायटीच्या आवारात गुंडांची दहशत सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद … महिलेच्या डोक्यात फरशीचे बॉक्स घालून दोघांना केले जखमी!

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०५ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मधील जांभूळकर पार्क येथे दि. ४ एप्रिल रोजी गुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, यात एक महिला जखमी झाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की सौ . वर्षा सचिन थोरात , वय २७ वर्षे , धंदा नोकरी , रा . के / ऑ . दिलीप पाटील , फलँट नं .202 , जिजाई निवास , जांभाळूकर पार्क लेन नं .6 , पिंपळे गुरव , पुणे . मुळ गाव मु.पो. चंदन सावरगाव , ता.केज जि.बीड यांनी सांगवी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.

Google Ad

वर्षा थोरात यांनी तक्रारीत म्हटले आहे की त्या व त्यांचे पती सचिन संदीप थोरात वय २८ वर्षे यांचेसह त्या सदर ठिकाणी राहत असून त्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतात. तर पती हे खाजगी दवाखान्यात काम करतात . दिनांक ०४ एप्रिल २०२१ रोजी रात्रौ १०.३० वाजण्याच्या सुमारास मालक दिलीप मुरलीधर पाटील यांनी पती सचिन यांना फोन करून सांगितले की , गेटवरुन कोणीतरी मुले उडी मारुन आले आहेत ते जावुन पाहा असे सांगितले.

मी व माझे पती असे बाहेर जावुन पाहिले असता एक मुलगा हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला इसम व त्याचे इतर दोन साथीदार त्यापैकी एकाने पिवळ्या रंगाचा शर्ट व दुसऱ्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील हे उडी मारुन आले होते व ते बिल्डींगमध्ये राहणारे सुनिल भोसले यांना बेदम मारहाण करीत होते, त्यावेळी थोरात हे “त्यांना मारु नका” असे म्हणाले, असता त्या तिघाजणांनी सचिन थोरात यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वर्षा थोरात या त्यांना वाचविण्यासाठी मध्ये गेल्या असता पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने काही तरी टणक वस्तुने ( फरशी चे बॉक्स ) डोक्यात मारुन वर्षा यांना जखमी केले, त्यात त्यांच्या डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला व डोक्यास टाके पडले. हा सर्व घडलेला प्रकार सी सी टीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

त्यावेळी वर्षा व सचिन थोरात आणि शेजारी राहणारे कृष्णा यडवल्ली श्रीनिवास राव , गोविंद मुकुंद सांगेकर , नुतन जगदीश शर्मा पाणी सांगवी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. पोलीसांनी वर्षा यांना औंध सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता पाठविले असता त्यांच्या डोक्यात जखम होऊन टाके पडले असल्याचे समजले. तसेच सुनील भोसले यांच्याही चेहऱ्यावर व डोळ्याला मार लागला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांच्या हाती सी सी टीव्ही फुटेज लागले असून सदर आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

असे प्रकार या भागात वरचे वर होत, असून पिंपळे गुरव मधील या भागात यामुळे दहशत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

21 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!