Categories: Uncategorized

“शंकर जगताप यांना भाजपची उमेदवारी द्या …” आमदार अश्विनी जगताप यांनी केली केली मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ ऑक्टोबर) : महाराष्ट्र राज्याची निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि विविध मतदारसंघातील नेते, इच्छुक तयारीला लागले आहेत. अशातच घराणेशाही आणि निवडणूक याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला लागल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. अशातच आता प्रत्येक ठिकाणी विरोधक एकवटले असतानाच चिंचवड मधून महत्वाची बातमी समोर आली आहे “शंकर जगताप यांना भाजपची उमेदवारी द्या …”-अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असल्याचे समजते आहे.

राज्यात जवळपास सर्वात मोठा असलेला चिंचवड मतदार संघ आहे. अशातच चिंचवड विधानसभेसाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावावर पक्षाच्या कोअर कमिटीत अंतिम शिक्कामोतर्ब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, आणि आता विध्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी दिलेली साथ यामुळे शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे, आणि ‘चिंचवडचा विधानसभेचा मीच दावेदार’ म्हणवणाऱ्या इच्छुकांची गोची झाली असून, भाजपकडून चिंचवडची उमेदवारी मागणाऱ्या पक्षातील बंडोबांना वरिष्ठ कसे थंड करतात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी शंकर जगताप यांच्यासमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काल (दि.१७) पुण्यात भेट घेतली, त्यांच्यासोबत लोकनेते लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या रेणुसे या देखील उपस्थित होत्या. आमदार अश्विनी जगताप यांनी माघार घेत दीर शंकर जगताप यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केला असल्याचे समजते, त्यामुळे कार्यकर्ते अधिक उत्स्फूर्तपणे कामाला लागले आहेत.

स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांच्या नियोजन बद्ध व्युव्हरचनेने सहज विजय झाला. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची राजकीय रणनीती तसेच त्यांच्या सोबत असणारे विश्वासू शिलेदार यांच्या प्रयत्नामुळे पोटनिवडणुकीत विजय अगदी सोपा झाला.

चिंचवड मतदारसंघावर जगताप कुटुंबाचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. चिंचवड मतदार संघात पिंपळे सौदागर, वाकड थेरगाव, चिंचवडगाव, रावेत, सांगवी, नवी सांगवी , पिंपळे गुरव, किवळे- मामूर्डी, पुनावळे हा उच्चभ्रु आणि आयटीयन्सचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी शहर अध्यक्ष असताना नेहमी बेरजेचे राजकारण करत संपुर्ण शहराचा विकास केला.

शांत, संयमी, सुशिक्षित आणि संघटनात्मक कौशल्य असणाऱ्या शंकर जगताप यांच्या नावाला जनतेची पसंती असताना दिसत आहे. संघाचे स्वयंसेवक व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट जगताप यांचे काम सुरू केल्यामुळे व लोकसभा निवडणूकीत आप्पा बारणे यांना चिंचवड विधानसभेतून तब्बल ९६ हजार मतांचा लीड मिळाले त्याचे श्रेय बारणे यांनी शंकर जगताप यांना दिले, जनतेचा महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहून जगताप विरोधकांची पंचायत झाली आहे. त्यामुळे चिंचवड मधील बंडखोरांची सुरू असलेली खेळी कितपत यशस्वी होतेय ये येणाऱ्या 23 नोव्हेंबर ला कळून येईल.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

4 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

6 days ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

6 days ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

7 days ago

चिंचवड मतदारसंघातील धनगर समाजाची ताकद शंकर जगताप यांच्या पाठीशी … शंकर जगताप यांना धनगर क्रांती सेना महासंघाचा जाहीर पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…

1 week ago