महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ जून : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात झाली. देहू-आळंदीत राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आणि त्या पुण्यातून पुढे मार्गस्थ आहेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
वारीत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. पुणे शहरातून पालखीचं प्रस्थान होत असल्याने त्यासाठी पुण्य नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.
आज दिनांक 13 जून रोजी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी होता. या सोहळ्यानिमित्त पुणे इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये वारकऱ्यांना मोफत इलेक्ट्रो होमिओपॅथी औषधोपचार करण्यात आले.या शिबिरामध्ये साडेतीनशे वारकऱ्यांना औषधोपचार करण्यात आला. या शिबिराला वारकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये डॉ. डी डी शहा,बापू दगडे, श्रीनिवास राव ,अशोक जगदाळे, प्रतिमा सिंग ,मोहन रायकर, सुनील आंगणे ,पांडुरंग कांबळे आणि हेमंत कुंडले यांनी औषधोपचार केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च : जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ मार्च - राज्यातील दारिद्र्यरेषेखालील महिला आणि ९ ते १४ वयोगटातील…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२५ : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय…
शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ…