महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ ऑक्टोबर० : जोरदार शक्ती प्रदर्शनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महारॅलीला सुरुवात झाली आहे. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन भव्य महारॅलीचा शुभारंभ झाला आहे.
शंकर जगताप आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, मा. नगरसेवक शत्रूग्न बापू काटे, मा.नगरसेवक राजेंद्र जगताप, संदीपआण्णा कस्पटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल,राम वाकडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, सिध्येश्वर बारणे, शहराध्यक्ष निलेश तरस, संतोष बारणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर शंकर जगताप यांच्या बरोबर रॅली मध्ये सहभागी झाले आहेत. महायुतीचे सर्व नेतेमंडळीनी रॅलीत सहभाग घेतल्याने विरोधकांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा यावेळी मतदारांमध्ये ऐकायला मिळत होती.
शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन महारॅलीचा शुभारंभ केला, त्यानंतर दापोडी येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले, पुढे जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर पुतळ्याला हार घातला, त्यावेळी नागरिकांनी घोंगडी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, पिंपळे गुरव बस स्टॉप, भगतसिंग चौक, जवळकर नगर येथून पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेल, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तापकीर चौक, काळेवाडी मार्गे थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये खूपच जल्लोष दिसून येत होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…