Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग ३१ एस सी प्रवर्गा मधून सुरेश सकट यांची आई सौ. धनाबाई सकट निवडणूक रिंगणात …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२४ डिसेंबर : राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ३२ प्रभागात १२८ नगरसेवक असून, नवी सांगवी-पिंपळे गुरव भागात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कायम पुढे असलेले सुरेश हरिभाऊ सकट हे प्रभाग ३१ नवी सांगवी पिंपळे गुरव मधून आपल्या आई सौ. धनाबाई हरिभाऊ सकट यांच्याकरिता अनुसुचित जाती प्रवर्ग एस.सी या प्रर्वगातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.

महानगरपालिकेचा प्रभाग ३१ हा अनुसुचित जाती प्रवर्ग (एस.सी) या प्रर्वगासाठी महिलांकरीता राखीव झाल्याने सुरवातीला सुरेश सकट हे खूप नाराज झाले होते, परंतु कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या आग्रहाखातर त्यांनी आपली आई धनाबाई हरिभाऊ सकट यांना निवडणूकित उतरवण्याचा निर्णय घेतला.

अहोरात्र समाजासाठी झटणारे, महिलांसाठी वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते आज अडगळीला टाकले जात आहेत, त्यातीलच एक नाव म्हणजे सुरेश सकट होय, … ते अनेक वर्षे नवी सांगवी पिंपळे गुरव भागात सामाजिक कार्य करत असूनही, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आज ते राजकारणापासून दूर आहेत, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) माध्यमातून अनेक वर्षे या भागात काम केले परंतु मनसेच्या काही चुकीच्या धोरणामुळे ते त्या पक्षापासून दूर गेल्याचे दिसत आहे. परंतु त्यांची स्वतःची वेगळी अशी एक प्रतिमा प्रभाग ३१ मध्ये असल्याचे जनतेच्या बोलण्यातून दिसून येते, आणि त्या विश्वासाच्या जोरावरच ते आपल्या आईला एस सी प्रवर्गागातून अपक्ष म्हणून निवडणूकित उतरवत असल्याचे बोलले जात आहे.

अपक्ष असलेल्या धनाबाई हरिभाऊ सकट या सुशिक्षित आहेत, परंतु आजचं राजकारण पाहिलं तर प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता लांब फेकला गेल्याचे दिसत आहे, तर केवळ दिखावूपणा, चमकोगिरी आणि कार्यक्रमांमध्ये पुढे पुढे दिसणारेच वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटासाठी धडपडताना दिसत आहेत. आपल्याला जनतेच्या विश्वासावर आणि आपल्या आणि मुलाच्या कार्याच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे सुरेश सकट यांची आई धनाबाई यांनी बोलताना सांगितले.

मी माझ्या हक्काच्या – जिवाभावाच्या माणसांच्या समस्या दूर करण्यासाठी कामी आलो आणि यापुढे देखिल माझे हेच ध्येय असेल…!
यामध्येच माझ्या असण्याचे समाधान मला लाभते आणि हे निरंतर चालू राहील अशी ग्वाही देतो… खरं तर यातूनच माझ्या जीवनाचे सार्थक झाले, असे मी म्हणेल….

सुरेश हरिभाऊ सकट
सामाजिक कार्यकर्ते ….

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकित प्रभाग ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मधून एस सी पर्वगातून दुगाताई मानसिंग आदियाल,नंदा अनिल चव्हाण, सुरेखा कैलास बनसोडे, धनाबाई हरिभाऊ सकट, दिप्ती अंबरनाथ कांबळे, सुनंदा काटे या महिला उमेदवार ४८६२० मतदारांमधून आपले नशीब आजमावत असताना दिसत आहे, आता जनता कोणाला पसंती देणार हे १६ जानेवारीच्या निकालात कळणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

4 days ago

केंद्राचा नवा प्लॅन! … महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलत, लोकसभेच्या २४ आणि विधानसभेच्या १०० जागा वाढणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल :  16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…

5 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

2 weeks ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

2 weeks ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

2 weeks ago