Categories: Uncategorized

पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांचा भर; अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे निर्देश

*आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्राची पाहणी*

*पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर; अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे निर्देश*

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १३ जून २०२६* आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मान्सूनपूर्व तयारीला गती देण्यात आली असून, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले आणि नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून सखल भागात पाणी साचू नये व पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना डॉ. सूर्यवंशी यांनी नदी व नाल्यांच्या वहनक्षमतेबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणांची दखल घेऊन तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, योगेश फल्ले, अंकुश झिटे, शांताराम माने तसेच कार्यकारी अभियंता, सह अभियंता तसेच, इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मान्सूनपूर्व तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना राबविल्या जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago